rule

rule
New Traffic rule
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत. हा नियम येत्या 1 जूनपासून लागू होणार आहे. या नव्या नियमानुसार, वेग मयदिपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल, तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25 हजार रुपये दंड भरावा लागेल. इतकेच नव्हे तर, ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल. या नियमानुसार अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही.

वाहतूक नियमांमध्ये बदल

1 जूनपासून वाहतूक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम पुढील महिन्यापासून लागू होतील. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला मोठा दंड भरावा लागेल.

नव्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीने अतिवेगाने गाडी चालवली तर त्याला 1,000 ते 2,000 रुपये दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. याशिवाय चालकाने हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावता गाडी चालवली तर त्याला 100 रुपये दंड भरावा लागणार आहे

अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास 25 हजार रुपये दंड भरावा लागेल

भारतात ड्रायव्हिंगचे वय 18 वर्षे आहे. अल्पवयीन, म्हणजे 18 वर्षाखालील अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास त्याला मोठा दंड आकारला जाईल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्याला 25 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. याशिवाय, अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.