रेशन कार्डचे फायदे रेशन दुकानातून अनुदानित दरात अन्न पुरवठा मिळवणे. याशिवाय रेशन कार्ड हे सरकारतर्फे दिले जात असल्याने रेशन कार्डचा पुरावा हा संपूर्ण देशात अधिकृत ओळखीचा पुरवा म्हणून ग्राह्य धरला जातो. पॅन कार्डसाठी अर्ज करताना, वाहन परवाना, आधार कार्ड किंवा बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अथवा अन्य कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्डला महत्त्व आहे. याशिवाय महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयातील उपचार घेण्यासाठी राज्यातील सर्व रेशन कार्डधारक पात्र आहेत.
👉 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈
कार्ड तयार करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक रेशन कार्ड काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला (सातबारा उतारा, वीजबिल), आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे), १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन भरणे आवश्यक आहे. याशिवाय शिधापत्रिका काढण्यासाठी, तुम्हाला जवळच्या ऑनलाइन सुविधा केंद्रात, आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा घरबसल्या www.rcms.mahafood.gov.in या वेबसाइटद्वारे अर्ज करता येतो. अर्ज करताना त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे जाऊन एकदा फोटो व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागते. पुरवठा विभागाकडून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना पिवळे रेशन कार्ड, ज्यांचे उत्पन्न १ लाखापर्यंत आहे त्यांना केशरी रंगाचे, तर १ लाखाहून अधिक उत्पन्न ज्यांचे आहे त्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते. अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति कार्डावर महिन्याला २० किलो तांदूळ व १५ किलो गहू असे ३५ किलो मोफत धान्य मिळते. प्राधान्य कुटुंब कार्डावर प्रति कार्ड ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मोफत मिळतात. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला पूर्वी मोफत धान्य दिले जायचे मात्र आता त्या कुटुंबात प्रति माणसी १५० रुपये रोख टीमार्फत थेट अनुदान खात्यात जमा केले जाते. रेशन कार्डामध्ये साधारणतः विवाहित महिलेचे, किंवा लहान मुलांची नावे नव्याने समाविष्ट करावी लागतात. लग्न होऊन नवऱ्याच्या घरी आलेल्या महिलेचे तिच्या माहेरच्या रेशन कार्डातून नाव वगळल्याचे प्रमाणपत्र सादर केले की नव्याने नाव समाविष्ट करता येते. तर, घरातील लहान सदस्यांचे नाव रेशन कार्डामध्ये समाविष्ट करण्यासाठी जन्माचे प्रमाणपत्र किंवा त्याचे आधार कार्ड जोडून अर्ज करावा लागतो, असे शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी डी.सी. मेंडके यांनी सांगितले.