लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये रक्षाबंधना दिवशी होणार खात्यात जमा तुमचे यादीत नाव पहा

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! राखीपौर्णिमेला मिळणार 5220 कोटी; 1 गॅस सिलिंडरही मोफत; अवघ्या 5 दिवसांत 2 कोटी अर्जांची पडताळणी; अर्ज करायला अजून २६ दिवस मुदत

 

या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 3000 रुपये

👉👉 यादीत नाव पहा 👈👈

राज्यातील जवळपास पावणेदोन कोटी लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून १९ ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रूपयांप्रमाणे पाच हजार २२० कोटी रूपये वितरीत केले जाणार आहेत.

त्यांना एक गॅस सिलिंडरही मोफत मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणी नाराज होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेऊन तालुकास्तरीय समित्यांनी अवघ्या पाच दिवसांतच सव्वादोन कोटी अर्जदारांच्या अर्जांची पडताळणी केली आहे हे विशेष.

 

या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 3000 रुपये

👉👉 यादीत नाव पहा 👈👈

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या दोन्ही योजनांचा लाभ अर्जदार पात्र महिलांना १९ ऑगस्ट रोजी वितरीत केला जाणार आहे. तीन दिवसांपूर्वी तालुकास्तरीय समित्यांनी जिल्हास्तरीय समित्यांकडे पाठविलेल्या अर्जांची संख्या दोन कोटींमधून २५ लाखांपर्यंत होती. मात्र, तीन दिवसांतच संपूर्ण अर्जांची पडताळणी पूर्ण करून लाभार्थींची यादी सरसकट पात्र ठरविण्यात आल्याची स्थिती आहे. अर्ज केलेली लाडकी बहीण नाराज होणार नाही, याची दक्षता पडताळणीवेळी घेण्यात आली आहे. त्यावेळी उज्वला योजनेतील लाभार्थी, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींची यादी देखील स्वतंत्र केली गेली नाही, हेही विशेषच.

👉तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जंगी कार्यक्रमाचे नियोजन

१९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्याच दिवशी सकाळी पात्र लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात प्रत्येकी तीन हजार रूपये वितरीत केले जाणार आहेत. त्यानंतर त्रुटी पूर्तता केलेल्या बहिणी व ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पैसे वितरीत होणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी महिलांना देखील त्याचवेळी एक गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहे.

 

👇👇👇👇👇

फॉर्म रद्द झाला तर काय करावे इथे क्लिक करून पहा

त्याचा मुंबईत मोठा जंगी कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू असून त्यासाठी काही कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

अन्नपूर्णा योजनेसाठी दरवर्षी चार हजार कोटी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील व उज्वला योजनेतील अंदाजे अडीच कोटी महिलांना दरवर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकार ५३० रूपये देणार आहे. या अन्नपूर्णा योजनेसाठी राज्य सरकारला दरवर्षी तिजोरीतून तीन हजार ९७५ कोटी रूपये द्यावे लागणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अर्जांची यादी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सर्वच अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय समित्यांनी केली असून जवळपास पाच लाख लाभार्थींची यादी जिल्हास्तरावर प्राप्त झाली. त्यांची यादी शासनाला सादर केली जाणर असून त्रुटी पूर्तता करणाऱ्या महिलांसह ज्यांनी अर्ज केलेला नाही, अशांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. त्यातील पात्र महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 3000 रुपये

👉👉 यादीत नाव पहा 👈👈

Leave a Comment