newrules रोख रक्कमेचे नियम काय? तुम्हाला जर ५०,००० रुपयांहून अधिक रक्कम तुम्हाला बचत खात्यात ठेवायची असेल तर तुम्हाला पॅन क्रमांक द्यावा लागतो. तसंच तुम्हाला एका दिवसासाठी १ लाख रुपयांपर्यंत पैसे खात्यात भरता येतात. तर जे लोक नेहमी पैसे डिपॉजिट करत नाहीत त्यांच्यासाठी अडीच लाखांपर्यंतची रोख रक्कम पॅनशिवाय खात्यात भरता येते. एका आर्थिक वर्षात तुम्हाला सर्व खात्यात मिळून जास्तीत जास्त १० लाख रुपये रोख रक्कम खात्यात भरता येते. तसंच १० लाखांहून अधिक रक्कम जर तुमच्या खात्यात असेल तर इन्कम टॅक्स विभागाकडून त्याची चौकशी देखील केली जाते. यासाठी तुम्हाला समाधानकारक उत्तर देणंही गरजेचं आहे.