वर्षाला मिळणार 3 गॅस सिलिंडर मोफत लवकरात लवकर करून घ्या ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Free Gas Scheme : राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी (e KYC)करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

मोफत मिळणार गॅस सिलेंडर ई-केवायसी करण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

👇👇👇👇👇

गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एलपीजी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहचवतात. त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे.

मोफत मिळणार गॅस सिलेंडर ई-केवायसी करण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

👇👇👇👇👇

राज्यात आजघडीला 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल 52 लाख 16 हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.

👉 लाडकी बहीण योजनेचे 52 लाख फॉर्म रद्द, आपले नाव पहा

यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे. लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील नेमक्या लाभार्थ्यांची संख्या कळू शकेल. योजनेसाठी एका कुटुंबात (शिधापत्रिकेप्रमाणे) एक लाभार्थी पात्र असेल.

गॅस सिलिंडरचे पैसे महिलाच्या बँक खात्यात कसे जमा होणार?

उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान देते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करेल.

👉 यावर्षात 147 दिवस शाळा बंद! शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रतिसिलिंडर 830 रुपये जमा करणार आहे.

या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

 

मोफत मिळणार गॅस सिलेंडर ई-केवायसी करण्यासाठी

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

Leave a Comment