अखेर तारीख जाहीर! लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार

Ladki bahin yojana installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे.

 

लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये या महिलांना मिळणार नाहीत

 

त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. त्यातच, आता, लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच बहि‍णींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

 

लाडकी बहीण योजनेसाठी किती अर्ज मंजूर आणि किती रद्द, यादी जाहीर

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत.

Leave a Comment