रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? पहा संपूर्ण यादी July 31, 2024 by Rushikesh Ration Card Apply list : रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून काढता येते किंवा आता ऑनलाइन पद्धतीनेही रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? पहा संपूर्ण यादी गोरगरीब, श्रमिक, गरजूंना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारण रेशन कार्ड दिले जाते. आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. राज्य सरकारतर्फे नागरिकांचे वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करून त्या- त्या गटानुसार त्यांना वेगवेगळे रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून काढता येते किंवा आता ऑनलाइन पद्धतीनेही रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा नागरिकांना परवडणाऱ्या किमती चांगल्या गुणवत्तेचे अन्न पुरवण्यासाठी पारित केला होता. एनएफएसए हा कायदा देशातील सर्व राज्यांसाठी दोन प्रकारचे रेशन कार्ड प्रदान करतो. प्रत्येक रेशन कार्ड आणि आधार क्रमांक लिंक करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेची पहिली यादी जाहीर यादीत नाव पहा रेशन कार्डचे दोन प्रमुख प्रकार 1. केशरी रेशन कार्ड : हे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखापर्यंत आहे, त्यांनाच दिले जाते. ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही किंव अत्यल्प उत्पन्न आहे, त्यांना हे कार्ड दिले जाते. बेरोजगार लोक, महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात. हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहे. त्यांना तांदळासाठी प्रतिकिलो तीन रुपये, गव्हासाठी दोन रुपये अनुदानित दराने अन्नधान्य मिळते.. 2. पांढरे रेशन कार्ड : याशिवाय ज्यांचे उत्पन्न अधिक आहे किंवा ते शासकीय कर्मचारी म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? पहा संपूर्ण यादी