Rules Change : फास्टॅगशी संबंधित सेवांवर १ ऑगस्टपासून नवा नियम लागू होणार आहे. आता फास्टॅगबद्दल अधिक सतर्क राहावं लागणार आहे. अन्यथा वाहनचालकांची डोकेदुखी वाढू शकते.
१ ऑगस्टपासून Fastag चे नवे नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती
फास्टॅगशी संबंधित सेवांवर १ ऑगस्टपासून नवा नियम लागू होणार आहे. आता वाहन घेतल्यानंतर ९० दिवसांच्या आत वाहनाचा नोंदणी क्रमांक फास्टॅग नंबरवर अपलोड करावा लागणार आहे. निर्धारित वेळेत नंबर अपडेट न केल्यास तो हॉटलिस्टमध्ये टाकला जाईल. त्यानंतर ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे, पण त्यातही वाहन क्रमांक अपडेट न केल्यास फास्टॅगला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे फास्टॅग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पाच आणि तीन वर्षे जुन्या सर्व फास्टॅगचं केवायसी करावं लागणार आहे.
लाडकी बहीण योजनेची पहिली यादी जाहीर यादीत नाव पहा
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) जूनमध्ये फास्टॅगसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती, ज्यामध्ये फास्टॅग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी १ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली होती. आता कंपन्यांना सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत मिळणार आहे. नव्या अटींनुसार नवीन फास्टॅग आणि रि-फास्टॅग जारी करणं, सिक्युरिटी डिपॉझिट आणि मिनिमम रिचार्जशी संबंधित शुल्कही एनपीसीआयने निश्चित केलं आहे.
१ ऑगस्टपासून Fastag चे नवे नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती
१ ऑगस्टपासून Fastag चे नवे नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती
फास्टॅग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडून याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. अशा तऱ्हेनं जे नवीन वाहन घेत आहेत किंवा ज्यांचा फास्टॅग जुना आहे, अशा सर्वांची अडचण वाढणार आहे. यासोबतच फास्टॅग वापरणाऱ्यांनाही आता सावध राहावं लागणार आहे कारण फास्टॅग ब्लॅक लिस्टिंगशी संबंधित नियमांवरही १ ऑगस्टपासून परिणाम होणार आहे. मात्र, त्याआधी कंपन्यांना एनपीसीआयनं घालून दिलेल्या सर्व अटींची पूर्तता करावी लागेल.
१ ऑगस्टपासून Fastag चे नवे नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती